शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा- वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:40 IST2021-06-07T16:30:16+5:302021-06-07T16:40:05+5:30
CoronaVirus Sindhudurg : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सध्या बंद आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आ. वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून बाहेरगावी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याची मागणी केली आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा- वैभव नाईक
ठळक मुद्देशिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा वैभव नाईक यांची मागणी, पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क
कणकवली : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सध्या बंद आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आ. वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून बाहेरगावी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याची मागणी केली आहे.
या मागणीची दखल मंत्री उदय सामंत यांनी घेतली असून त्याबाबत त्यांनी राज्याचे आरोग्य संचालक यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.