शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

नगरपंचायतला मिळालेला विकासनिधी राणे यांच्या शिफारशीनुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 11:57 AM

NiteshRane Sindhudurgnews- जिल्हा नियोजनमधून कणकवली नगरपंचायतला मिळालेला विकासनिधी हा स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मिळाला आहे . त्यामुळे आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर या जोडीने त्याचे फुकटचे श्रेय घेवू नये.

ठळक मुद्दे नाईक आणि संदेश पारकर जोडीने फुकटचे श्रेय घेवू नये नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला टोला

कणकवली : जिल्हा नियोजनमधून कणकवली नगरपंचायतला मिळालेला विकासनिधी हा स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मिळाला आहे . त्यामुळे आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर या जोडीने त्याचे फुकटचे श्रेय घेवू नये.याउलट नगरपंचायत विकास आराखड्यातील ३० कोटी ६४ लाख रुपयांचे परिपूर्ण प्रस्ताव अद्याप जिल्हा नियोजनकडे प्रलंबित आहेत. त्यासाठीचा निधी मंजूर करून आणल्यास नाईक- पारकर जोडीचे आम्ही जाहीर अभिनंदन करू. असा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे .कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , आरोग्य सभापती अभिजित मुसळे , गटनेता संजय कामतेकर , नगरसेवक रवींद्र गायकवाड , विराज भोसले, माजी नगरसेवक बंडू गांगण , महेश सावंत आदी उपस्थित होते .समीर नलावडे म्हणाले, भूमिगत विजवाहिनीसाठी खोदाई केल्यावर रस्ता दुरुस्ती कामासाठी कणकवली नगरपंचायतने ७६४ रुपये १४ पैसे प्रतिमिटर दर विजवीतरण कंपनीला दिला होता . मात्र , ५ हजार प्रतिमिटर दर दिल्याने ६ कोटींचा निधी मागे गेल्याचे संदेश पारकर यांच्या आडून सांगणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी आपले अज्ञान उघडे केले आहे.पारकर यांनी दलाल भवन ऐवजी विजय भवन मध्ये पत्रकार परिषद घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. असे सांगतानाच पालकमंत्री उदय सामंत हे आमचे जुने मित्र आहेत . त्यामुळे पारकर यांनी कणकवलीच्या विकासनिधीची काळजी करू नये असा टोलाही नगराध्यक्ष नलावडे यांनी लगावला . यापुढे पारकर यांनी केवळ पत्रकार परिषद घ्याव्यात कारण तेवढेच काम त्यांना शिल्लक राहिले आहे. आम्ही शहरातील विकासकामांची भूमिपूजन आणि उदघाटने करु. नगरपंचायतकडे सध्या एक लहान व एक मोठा अग्निशामक बंब आहे.मात्र ही अग्निशामक यंत्रणा १५ वर्ष जुनी आहे . कणकवली शहराचे वाढते व्यापारीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पारकर यांनी सुसज्ज असा मोठा अग्निशामक बंब नगरपंचायतीसाठी आणावा.शहरातील भूमिगत विजवाहिन्यांची लांबी ८ हजार ९६० मीटर लांब होती. त्यासाठी रस्ते दुरुस्तीसाठी प्रतिमिटर ७६४ रुपये १४ पैसे दराने एकूण ६८ लाख ४६ हजार ७५० रुपये विजवीतरण कंपनीकडे मागितले होते . तसे २९ मार्च २०१९ आणि २० फेब्रुवारी २०२० रोजीचे लेखीपत्रच नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सादर करत आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्या प्रतिमिटर ५ हजार दराच्या आरोपातील हवाच काढून टाकली. वास्तवात नसलेला वाढीव दर सांगणाऱ्या नाईक आणि पारकर यांचेच काहीतरी भ्रष्टाचार करण्याचे साटेलोटे असेल म्हणूनच ठेकेदार कंपनीला नगरपंचायतची भेट घेऊ दिली नसल्याचा आरोपही नलावडे यांनी केला .आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्यामुळे भूमिगत विजवाहिनीचा ६ कोटींचा निधी मागे गेल्याची टीका नलावडे यांनी केली. केसरकर पालकमंत्री असताना तत्कालीन सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या काळात २४०० रुपये प्रतिमिटर रेट दिल्याने सावंतवाडी शहरासाठी आलेला भूमिगत वीज वाहिन्यांसाठीचा ११ कोटींचा निधी मागे गेला . त्याबाबत आमदार वैभव नाईक का बोलत नाहीत ? असा सवाल करतानाच आमदार नाईक हे कणकवली नगरपंचायतची नाहक बदनामी करत आहेत .

राज्यातील नगरविकास खाते असलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीच्या विकासाची एवढीच कळकळ असल्यास नगरपंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळवून द्यावा. प्रभारी मुख्याधिकारी देऊन शिवसेना कणकवली नगरपंचायतवर सूड उगवत असल्याचा आरोप नलावडे यांनी केला.भालचंद्र महाराज संस्थान सभा मंडपसाठी नगरपंचायतचा दोन वेळा नाहरकत दाखला दिला.स्थानिकांचा असलेला विरोध मी स्वतः जाऊन चर्चा करून शांत केला असल्याचेही नलावडे यांनी यावेळी सांगितले . 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KankavliकणकवलीSandesh Parkarसंदेश पारकरVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग