केंद्रीय गृहराज्यमंत्री तीन दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौर्‍यावर, बांद्यात उत्स्फूर्त स्वागत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 11, 2022 13:01 IST2022-08-11T13:00:16+5:302022-08-11T13:01:08+5:30

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तीन दिवसीय दौर्‍यावर

Union Home Minister Ajay Kumar Mishra on a three day Ratnagiri-Sindhudurg tour | केंद्रीय गृहराज्यमंत्री तीन दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौर्‍यावर, बांद्यात उत्स्फूर्त स्वागत

केंद्रीय गृहराज्यमंत्री तीन दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौर्‍यावर, बांद्यात उत्स्फूर्त स्वागत

बांदा (सिंधुदुर्ग) : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा हे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तीन दिवसीय दौर्‍यावर आले आहेत. आज, गुरूवारी सकाळी त्यांचे बांदा येथे मोटरसायकल रॅलीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध स्वयंभू श्री देव बांदेश्वराचे दर्शन घेतले. तसेच ग्रामदेवता श्री देवी भूमिका मातेचे आशिर्वाद घेतले. दरम्यान त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Web Title: Union Home Minister Ajay Kumar Mishra on a three day Ratnagiri-Sindhudurg tour