शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वाळू उत्खनन, मालवण तालुक्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:11 IST

मालवण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअनधिकृत वाळू उत्खनन, मालवण तालुक्यातील प्रकार कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

मालवण : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने ते वाळू माफियांना पाठिंबा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाळू उत्खनन, वाहतूकीमुळे गोरगरिबांना त्रास होत आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास ओरोस येथील गौणखनिज कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.तालुक्यातील आंबेरी बागवाडी, देवली या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री दोन यावेळेत वाळू उपसा व अनधिकृत वाहतूक होत आहे ती बंद करावी. आंबेरी ते मुख्यरस्त्याकडे सदानंद गोरे यांच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले. अवजड वाहतूकीमुळेच ही झाडे पडली. येथील रस्ता आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे.

मसुरे, तेरई, कालावल तसेच धामापूर-बौद्धवाडी तसेच काळसे वाकवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनन सायंकाळी सहा ते पहाटे चार यावेळेत सुरू आहे. याठिकाणी परप्रांतीय कामगारांमुळे गावचे वातावरण कलुषित होत आहे. वाळू उत्खननास होड्यांना दिलेली परवानगी मेरीटाईम बोर्डाने तपासावी. परवानग्या नसलेल्या होड्यांवर कारवाई करावी.अनधिकृत वाळू उपसा, वाहतुकीवर कारवाईसह अन्य महत्वाच्या विषयांवर कारवाईचे पाऊल न उचलल्यास गौणखनिज कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशाराही केनवडेकर यांनी दिला आहे.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्ग