Unauthorized bouts of bulls, organizers, bull owners and some others | बैलांच्या अनधिकृत झुंजी, आयोजक, बैल मालक व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल

बैलांच्या अनधिकृत झुंजी, आयोजक, बैल मालक व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल

ठळक मुद्देबैलांच्या अनधिकृत झुंजी, आयोजक, बैल मालक व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल निवती पोलिस ठाण्यात कारवाई सुरू

सिंधुदुर्ग  :  बैलांच्या झुंजीना बंदी असताना अनधिकृतरित्या बैल झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. अनेकजण पळून गेल्याचे सांगण्यात आले, आयोजक व झुंज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.  निवती पोलिस ठाण्यात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.

कोचरे (आतील गावात) अनधिकृतरित्या बैल झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. झुंज पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या टीमने झुंज होत असलेल्या ठिकाणी अचानक धडक दिली.पोलिस येताच सगळीकडे पळापळ झाली, खळबळ उडाली. पोलिसांनी काही बैल, गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक गावातून बैल आले होते अशीही माहिती मिळाली. मात्र अनेकजण पळून गेल्याचे सांगण्यात आले.

अनधिकृत झुंज प्रकरणी आयोजक व झुंज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. काही जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.

Web Title: Unauthorized bouts of bulls, organizers, bull owners and some others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.