शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray सिंधुदुर्गातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By अनंत खं.जाधव | Updated: November 13, 2024 16:36 IST

Uddhav Thackeray Hard come to Adani to put the lands in Sindhudurga konkan दीपक केसरकरावर टीकास्त्र 

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचे काम सुरू असून कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या सीमेवर गोल्फ कोर्ससाठी मंत्री दीपक केसरकर व गोव्यातील उद्योगपती जमिनी शोधताहेत. शेतकऱ्यांनी आपला सात बारा सांभाळून ठेवावा असे सांगत शिवसेना उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. तसेच दहशतवाद कायमचा संपवायचा असेल तर जिल्ह्यात बदल घडवावाच लागेल असे आवाहनही ठाकरे यांनी केले.सावंतवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ गांधी चौकात सभा पार पडली. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार सुधीर सावंत, प्रविण भोसले, राजन तेली, परशुराम उपरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, लोकसभा निवडणुकीत थोडी चुक झाली. पण आता चुक सुधारण्याची संधी आली असून तुम्हाला बदल घडवावाच लागेल. नाहीतर आपणास पुढची पिढी माफ करणार नाही. अन्यथा कायमचा दहशतवाद स्वीकारावा लागेल. यासाठी सर्वांनी जागृत होऊन काम करा असे आवाहन केले. येथील आमदार 'खाल मुडी पातळ धुडी आहेत' नेहमी खालून वाकून बोलतात त्यामुळे आता येथील जनतेने सावध व्हावे नाहीतर कधी याठिकाणी मायनिंग सारखे उद्योग येतील सांगता पण येणार नाहीत अशी खिल्ली उडवली...अन्यथा तुमचा सात बारा अदाणीच्या नावे होईल सावंतवाडीतील आरोग्याचा प्रश्न ज्यांना सोडवता आला नाही ते तुमचा काय विकास करणार असा सवाल करत आता सर्वांनी आपले सात बारा जपून ठेवा अन्यथा तुमचा सात बारा कधी अदाणीच्या नावे होईल सांगता येणार नाही. येथील मंत्री दीपक केसरकर व गोव्यातील उद्योगपती हे कोल्हापूर सिंधुदुर्ग च्या सीमेवर अडाणी साठी गोल्फ कोर्स साठी जमिनी शोधताहेत म्हणजे कोकणपण अदाणीच्या घशात घालण्याचे काम सुरू झाले आहे असा आरोप ठाकरे यांनी केला.राऊत यांनी महायुतीवर टीका करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंधरा वर्षात एकही उद्योग आणला नाही म्हणून रोजगारासाठी सर्वांना बाहेर जावे लागत आहे असा आरोप केला. तर राजन तेली यांनी मला व माझ्या कुटुंबाला धोका असून तुम्ही माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, मी जिल्ह्यातील सेनेची जबाबदारी घेतो माझे काय होईल त्याचा विचार करणार नाही असे सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Teliराजन तेली thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024