शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: शेर्पे येथील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:44 IST

खारेपाटण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना कार्यकर्ते बाळा राऊत यांना ...

खारेपाटण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना कार्यकर्ते बाळा राऊत यांना मंगळवारी सायंकाळी ६:२० वाजता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांना तातडीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण विभागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी खारेपाटण येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले आहेत.याबाबत अधिक वृत्त असे की, शेर्पे निवडणूक मतदान सायंकाळी ६:०० पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते बाळा राऊत हे शेर्पे येथे दुकानात बसले असता, अचानक ६:२०च्या दरम्यान दोन गाड्या भरून कार्यकर्ते आले. त्यानंतर, त्यांनी काही समजण्याच्या आत ‘मला लाथाबुक्क्यांनी व दांड्यांनी मारहाण करून जीवे मरण्याची धमकी दिली असल्याचे’ जखमी शिवसैनिक बाळा राऊत यांनी सांगितले, तर भाजप पक्षाचे कार्यकर्ते बाळा जठार व दिलीप तळेकर, नाना शेट्ये यांसह भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे यावेळी बाळा राऊत यांनी सांगितले.

ही घटना समजताच उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कन्हैया पारकर, कणकवली उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने खारेपाटण येथे दाखल झाले, तसेच खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे उपचार सुरू असलेले जखमी शिवसैनिक कार्यकर्ते बाळा राऊत यांची भेट घेत विचारपूस केली.आंदोलनाचा इशारादरम्यान, आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाही न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCrime Newsगुन्हेगारी