उद्धवसेनेने स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत, नितेश राणे यांचे आव्हान

By सुधीर राणे | Updated: June 19, 2024 16:54 IST2024-06-19T16:54:05+5:302024-06-19T16:54:52+5:30

राहुल गांधी यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाही

Uddhav Sena should show its strength by electing 10 MLAs, Nitesh Rane challenge | उद्धवसेनेने स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत, नितेश राणे यांचे आव्हान

उद्धवसेनेने स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत, नितेश राणे यांचे आव्हान

कणकवली: मुंबई बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पाकिस्तानचे झेंडे कुठे दिसायचे नाहीत. मात्र, आज उद्धव ठाकरेंमुळे जागोजागी पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत. भाजपवर टीका करणाऱ्या उद्धवसेनेने हिंमत असेल तर कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी राणे यांनी बुधवारी संवाद साधला.

राणे म्हणाले, जर एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली नसती तर बाळासाहेबांचे नाव उद्धवसेनेच्या बॅनरवर कधीही दिसले नसते. संजय राऊत यांनी कितीही मिश्किल टोले मारु देत. मात्र, आता घोडा मैदान दूर नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलून दाखवले आहे, ते सत्यात उतरविण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. उद्धवसेनेची हिम्मत असेल तर काँग्रेस,शरद पवार यांची मदत ना घेता स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत. उद्धवसेना नावाच्या डुबत्या जहाजात कोण कशाला जाईल ? छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. ते एवढी मोठी चूक कधीच करणार नाहीत. आता ते अजित पवार यांच्यासोबत आहेत.त्यांना साथ देत आहेत.

राहुल गांधी यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाही

मराठा ,ओबीसी किंवा इतर प्रत्येक समाजाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे.मात्र हिंदूंमध्ये फाटाफूट होते त्याचा फायदा इतरांना होतो आहे, याचा विचार झाला पाहिजे. नाना पटोले यांच्या रूपाने काँग्रेसची संस्कृती समाजाला कळली आहे. आम्ही पण काँग्रेसमध्ये असताना बरेच काही बघितलेले आहे. ते केव्हा तरी महाराष्ट्राला सांगावे लागेल. हॉटेलमध्ये ह्यांचे नेते काय काय करतात याचे व्हीडिओ बाहेर आले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या परवानग्या देवेंद्र  फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र उद्धव ठाकरे औरंगजेब, टिपू सुलतानचे स्मारक बांधतील. तर राहुल गांधी यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाही असेही राणे म्हणाले.

Web Title: Uddhav Sena should show its strength by electing 10 MLAs, Nitesh Rane challenge