The type of rift sloping at Amboli Ghat | आंबोली घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार
आंबोली घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार

ठळक मुद्देआंबोली घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारएक दगड पर्यटकांच्या गाडीच्या काचेवरती पडला

आंबोली/सिंधुदुर्ग: आंबोलीमध्ये पाऊस सुरू होऊन जेमतेम दोन दिवस झाले असून या दोन दिवसांच्या पावसामध्ये आंबोली घाटात ठिकठिकाणी तुरळक दरड कोसळण्याचे प्रकार घडले.  त्यामध्ये एक दगड पर्यटकांच्या गाडीच्या काचेवरती पडला, सुदैवाने तो बचावला.

आंबोली चाळीस फुटांची मोरी तसेच मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावरती या दरडी कोसळल्या चाळीस फुटांची मोरी या ठिकाणी तुरळक दरड कोसळल्या, परंतु मुख्य धबधब्याच्या खाली मात्र मोठे दगड रस्त्यावर आले होते. एक दगड पर्यटकांच्या गाडीच्या काचेवरती पडला, सुदैवाने तो बचावला.

सकाळी अकरावाजेपर्यंत बांधकाम विभागाला याची माहिती नव्हती. अकरा वाजता बांधकाम विभागाचा कर्मचारी त्याठिकाणी पोहोचला,  त्यानंतर त्याने याबाबत आपल्या वरिष्ठांना खबर दिली. केवळ दोन दिवस कोसळलेल्या पावसाने ही दरड खाली आली होती.

यामुळे येत्या काळात कोसळणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने बाधकाम विभागाला सतर्क राहून उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. घाटात कोसळलेली दरड ही पहाटेच्या सुमारास कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सुदैवाने दरम्याने कोणते वाहन आले नाही, अन्यथा मोठी हानी झाली असती.

आंबोली घाटरस्त्यावर बांधकाम विभागाकडून घाटांमध्ये दरड कोसळणे किंवा झाड कोसळले हे प्रकार पाहण्यासाठी सकाळी व संध्याकाळी एक कर्मचारी कर्मचारी नेमणूक व्हावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तसेच वाहनचालकांमधून  होत आहे.

घाटांमध्ये दरड किंवा झाड कोसळतात परंतु बांधकाम विभागाला त्याची माहिती नसते, वर्षा पर्यटन हंगाम तोंडावर असून तत्पूर्वी ठिकठिकाणी पर्यटकांसाठी सूचना फ़लक तसेच घाट रस्त्यांवरील संरक्षक कठदयावर रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे आहे, अशी मागणी आंबोलीतील ग्रामस्थांमधून होत आहे.


Web Title: The type of rift sloping at Amboli Ghat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.