वेंगुर्ला : कणकवली येथील दोघा महिलांकडून वेंगुर्ला शहरातील एका तरुण व्यावसायिक युवकाची ९ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूकीची घटना घडली आहे. ही घटना दि. २४ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता ते २६ फेब्रुवारीला दुपारी १२:३० वाजण्याच्या मुदतीत वेंगुर्ला शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये घडली आहे. याबाबत संबंधित युवा व्यावसायिकाने वेंगुर्ला पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. त्याने वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि. २ मार्च) संबंधित दोन्ही महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत वेंगुर्ला पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील दोन महिलांनी (वय ३०, व ३६ ) वेंगुर्ला येथे एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये येऊन संबंधित व्यावसायिकांना www.stake.com या गेमिंग ॲप्लिकेशनबाबत माहिती देऊन पैसे गुंतवल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल, असे आमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन केला.त्यानंतर त्यांच्याकडून त्या ॲपसाठी एका महिलेने दिलेल्या YES बँक शाखा डोंबिवली - ईस्ट, खात्यावर ९ लाख ९० हजार रुपये रक्कम RTGS द्वारे भरण्यास सांगून ते घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर हे अधिक तपास करत आहेत.
नागरिकांनी वेळीच सावध व्हावेपोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरविली आहेत. मागील कालावधीत रेडी येथील युवकाची अशीच मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असून तरुणवर्ग झटपट पैसा मिळविण्याच्या व वाढविण्याच्या नादात नुकसानग्रस्त होत आहेत. नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा महिला भामट्यांपासून सावध व्हावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडूनही करण्यात येत आहे.
Web Summary : Two women defrauded a Vengurla businessman of ₹9.9 lakh by luring him with high returns on a gaming app investment. Police are investigating, urging caution against such scams.
Web Summary : वेंगुर्ला के एक व्यवसायी को गेमिंग ऐप में निवेश पर अधिक मुनाफे का लालच देकर दो महिलाओं ने 9.9 लाख रुपये की धोखाधड़ी की। पुलिस जांच कर रही है, ऐसे घोटालों से बचने की सलाह दी।