कणकवलीत दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:52 AM2021-02-13T11:52:13+5:302021-02-13T11:55:46+5:30

Police Sindhudurgnews- माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यात गेले काही दिवस सुरु असलेला राजकीय वाद आता टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांना फटके घालण्याची भाषा झाल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीनेच कणकवलीत दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या कणकवलीच्या पटवर्धन चौकात तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

Two units of riot control squad deployed in Kankavali | कणकवलीत दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात

कणकवलीत दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात

Next
ठळक मुद्दे दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या कणकवलीत तैनातसिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांकडून​​ खबरदारीच्या उपाययोजना

कणकवली:  माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यात गेले काही दिवस सुरु असलेला राजकीय वाद आता टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांना फटके घालण्याची भाषा झाल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीनेच कणकवलीत दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या कणकवलीच्या पटवर्धन चौकात तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या समर्थनार्थ विनायक राऊत यांचा पुतळा जाळण्यापासून ते अनेक इशारे दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. त्या​​तच शिवसेनेकडूनही राणे यांना प्रत्युत्तरादाखल निर्वाणीचा इशारा देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
 

Web Title: Two units of riot control squad deployed in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.