शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तृतीयपंथी वेशातील व्यक्तींचा युवतीला पळवण्याचा प्रयत्न, ग्रामस्थांनी पाठलाग करत पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:12 IST

तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव बाजारपेठेतून दोन तृतीयपंथी वेशातील व्यक्तींनी चक्क नांदगाव तिठ्यावरील एका युवतीला पळवून नेत असताना ग्रामस्थांनी ...

तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव बाजारपेठेतून दोन तृतीयपंथी वेशातील व्यक्तींनी चक्क नांदगाव तिठ्यावरील एका युवतीला पळवून नेत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून त्या युवतीला सोडवले. त्या युवतीला सहा आसनी रिक्षेतून हुंबरठ येथे ताब्यात घेतले. मात्र, ती युवती घरी येण्यास तयार नव्हती. त्या तृतीयपंथीयांनी त्या युवतीवर जादूटोणा केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

सध्या त्या युवतीवर मानसोपचारतज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सायंकाळी उशिरा कणकवली पोलिसांच्या तपासात ते दोघे तृतियपंथीय नसून पुरूष असल्याचे उघडकीस आले आहे.गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नांदगाव बाजारपेठेमध्ये दोन तृतीयपंथी व्यक्ती फिरत होत्या. दुकानांमध्ये पैसे मागत असताना ते बाजारपेठेलगतच्या एका घरामध्ये गेले. त्या घरातील युवतीला त्यांनी बोलण्यात गुंतवले. त्यानंतर काही वेळाने ती युवती त्या दोघांसमवेत बाहेर जाण्यास निघाली. सहा आसनी रिक्षातून ती युवती आणि दोन तृतीयपंथीय कणकवलीच्या दिशेने निघाले. ही बाब नांदगावातील काही ग्रामस्थांना समजली. त्यानंतर दुचाकी आणि अन्य वाहने घेऊन ग्रामस्थांनी कणकवलीच्या दिशेने धाव घेतली.या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनाही कळविण्यात आली. त्यानंतर त्यांचा पाठलाग करत हंबरट फाटा येथे सहा आसनी रिक्षा थांबविण्यात आली. पोलिस तेथे आल्यानंतर त्यांनी युवतीला नातेवाइकांच्या ताब्यात दिले. मात्र, ती आपल्या घरी येण्यास नकार देत होती. अखेर तिला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दोन तृतीय पंथीयांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या तरुणीवर जादूटोणा केला असण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती. वेळीच लक्षात आल्याने पुढील मोठा धोका टळला असल्याचे बोलले जात होते.तपासाअंती त्या व्यक्ती तृतीय पंथी आहेत का? हे स्पष्ट होईल. दरम्यान पळवून नेलेल्या युवतीवर कुडाळ येथे मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडे उपचार सुरू आहेत. तृतीय पंथी वेशातील त्या दोघांचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत. याबाबत उशिरापर्यंत सविस्तर माहिती समजू शकलेली नाही.ते दोघे तृतीयपंथी नसून बुलढाणा येथील पुरूषसाडी आणि ब्लाऊज असा स्त्री वेश परिधान केलेले ते दोन्ही तृतीयपंथी नसून पुरूष असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.  ते दोघे बुलढाणा जिल्ह्यातील असून दोघेही पत्नी आपली मुले कुटुंबासह मागील काही दिवस कुडाळ येथे राहत आहेत.  स्त्री वेश परिधान करण्यामागे भिक्षा मागणे सोपे जावे म्हणून स्त्रीवेश परिधान केल्याचे दोघांनीही पोलिसांना सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस