कार उलटून झालेल्या अपघातात दोघे ठार, एक जखमी; जखमीला घेवून जाणारी रुग्णवाहिका वाटेतच पेटली
By अनंत खं.जाधव | Updated: August 27, 2022 17:21 IST2022-08-27T17:20:50+5:302022-08-27T17:21:14+5:30
सावंतवाडी : कार उलटून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातातील ...

कार उलटून झालेल्या अपघातात दोघे ठार, एक जखमी; जखमीला घेवून जाणारी रुग्णवाहिका वाटेतच पेटली
सावंतवाडी : कार उलटून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातातील जखमीला उपचारासाठी घेवून जात असताना वाटेतच रुग्णवाहिका देखील पेटली. ही दुर्दैवी घटना आज, शनिवारी झाराप पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे घडली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कार चालकाचे गाडीवरील ताबा सुटला. यामुळे कार डिव्हायडरला आदळून उलटली. या अपघातात दोघे जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. यातील जखमीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी घेवून जात असताना वाटेतच रुग्णवाहिकाही पेटली.