शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी–एडगांव मार्गावर अपघाताची मालिका सुरूच, टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळून दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:16 IST

वैभववाडी  : वैभववाडी–एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच आहे. चार दिवसांत चार अपघात घडले आहेत. आज पहाटेच्या सुमारास याच ...

वैभववाडी  : वैभववाडी–एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच आहे. चार दिवसांत चार अपघात घडले आहेत. आज पहाटेच्या सुमारास याच मार्गावर आणखी एक अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळली. एडगाव सर्व्हीसींग सेंटर नजीक हा अपघात घडला. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

शीतल चप्पा (वय 36) व प्रकाश मंधानिया (33, दोघेही रा. मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.  या ट्रॅव्हल्स मधून एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.मुंबईहून गोव्याला टेंपो ट्रॅव्हल्स (एमएच 47 वाय 2522) ने निघाले होते. करुळ घाट उतरून गाडी एडगाव येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात शीतल चप्पा व प्रकाश मंधानिया हे दोघे जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार नितीन खाडे, पो. ना. रमेश नारनवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड हे घटनास्थळी दाखल झाले. एडगांव येथील स्थानिक ग्रामस्थ हेमंत रावराणे, सचिन रावराणे, रवींद्र रावराणे, निलेश रावराणे, रोशन सुतार, बच्चाराम रावराणे यांनी पोलिसांना मदत केली.पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्या दोघांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.वैभववाडी ते एडगांव या मार्गावर चार दिवसात चार अपघात घडले आहेत. एडगांव रामेश्वर मंदिर नजीक ट्रक पलटी होऊन अपघात झाला होता. तसेच घाडीवाडीनजीक मनीष ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागून बस जळून खाक झाली होती. शुक्रवारी एडगांव पुलावरून कार सुखनदी पात्रात कोसळली. सुदैवाने या चारही अपघातात जीवितहानी टळली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात