बांदा-सटमटवाडी येथे रस्ता क्रॉसिंग दरम्यान दोन कारमध्ये जोरदार धडक, दोन्ही कारचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 13:51 IST2022-01-05T13:44:23+5:302022-01-05T13:51:30+5:30
रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या इको कारची वॅगनार कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला.

बांदा-सटमटवाडी येथे रस्ता क्रॉसिंग दरम्यान दोन कारमध्ये जोरदार धडक, दोन्ही कारचे मोठे नुकसान
बांदा : रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या इको कारची वॅगनार कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर बांदा-सटमटवाडी टोलनाका परिसरात घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. तर बांदा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता अपघाताबाबत अद्याप कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, अपघातग्रस्त इको कार गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी रस्ता क्रॉसिंग दरम्यान वॅगनारला इको कारची जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणी जखमी झाले का? याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही.