शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

नीतेश राणे : कणकवली उपजिल्हा रूग्णालयाला भेट, जाणून घेतल्या समस्या

कणकवली : जनतेला अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी कणकवलीसह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्य शासनाने अकरा महिन्यांची सेवानियुक्ती डॉक्टरांना देऊन रिक्त पदे भरावीत अशी आग्रही मागणी शासनाकडे करणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना सांगितले.कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आमदार राणे यांनी तेथील आरोग्य सुविधांबाबत तसेच समस्यांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. श्रीधर जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. यामध्ये सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ही वर्ग २ ची आहेत. यामध्ये नेत्रतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, एम.डी.मेडिसिन व अपघात विभागासाठी लागणारे तीन डॉक्टर अशा पदांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी यायला इच्छुक नसल्याचे यावेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाकडून यापूर्वी ११ महिन्यांची नियुक्ती डॉक्टरांना दिली जात होती. मात्र, अशा नियुक्त्या बंद केल्याने तसेच वर्ष दोन वर्षाने इच्छित स्थळी बदली मिळण्याची आशा नसल्याने नियुक्ती होऊनही सिंधुदुर्गात डॉक्टर यायला इच्छुक नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे नवनियुक्त मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून ११ महिन्यांची नियुक्ती डॉक्टरांना सिंधुदुर्गात मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी विनंती करण्यात येईल असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ट्रामा केअर सेंटरसाठी ५० लाखांचा तर अत्याधुनिक शवविच्छेदन केंद्रासाठी २२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच तळेरे येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठीही निधी प्राप्त झाला होता. त्या कामांचा आढावा नीतेश राणे यांनी यावेळी घेतला.उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून तसा प्रस्ताव शासनाजवळ पाठविण्याची सूचनाही नीतेश राणे यांनी यावेळी केली. (वार्ताहर)