आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा : नितेश राणे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 05:17 PM2019-01-28T17:17:06+5:302019-01-28T17:18:38+5:30

वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात बदल घडत असतो. त्यामुळे वाचन हे आवश्यक आहे . वाचकांना आपल्याकडे वळविण्यासाठी आधुनिकतेची कास धरीत ग्रँथालयानी आता बदलत्या काळानुसार आपल्या कार्यपध्द्तीत बदल घडविणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक गोष्टीत शासनावर अवलंबून न रहाता आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन कणकवली नगरवाचनालयाचे अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांनी येथे केले.

Try to be financially capable: Nitesh Rane's appeal | आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा : नितेश राणे यांचे आवाहन

कणकवली येथे आयोजीत ग्रँथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी मनोगत व्यक्त केले.

Next
ठळक मुद्देआर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा : नितेश राणे यांचे आवाहनकणकवलीत जिल्हा गँथालय संघाचे अधिवेशन

कणकवली : वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात बदल घडत असतो. त्यामुळे वाचन हे आवश्यक आहे . वाचकांना आपल्याकडे वळविण्यासाठी आधुनिकतेची कास धरीत ग्रँथालयानी आता बदलत्या काळानुसार आपल्या कार्यपध्द्तीत बदल घडविणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक गोष्टीत शासनावर अवलंबून न रहाता आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन कणकवली नगरवाचनालयाचे अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांनी येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रँथालय संघ आणि नगरवाचनालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे रविवारी ग्रँथालयांचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रँथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य , सुहास चव्हाण , जिल्हा ग्रँथालय अधिकारी योगेश बिर्जे, कल्पना सावंत, अशोक करंबेळकर, डी. पी. तानावडे, मेघा गांगण, जान्हवी जोशी, नगरसेवक अभिजित मुसळे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील वाचन संस्कृतीबद्दल या अधिवेशनात आदान प्रदान व्हायला हवे. ग्रँथालयांच्या डिजिटलायझेशनचे फायदे याबाबतही विचारमंथन होणे गरजेचे आहे. ग्रँथालयांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत. अगदी नवीन शासन आले तरी त्या समस्या तशाच रहातात. त्यामुळे आमच्या सारख्या राजकारणी माणसांनी अधिवेशनात उपस्थित राहून फक्त टाळ्या मिळविण्यासाठी वारेमाप आश्वासने द्यायची .याला काहीच अर्थ नाही. समस्या सुटण्यासाठी मुळापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.

ग्रँथालय कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन अशा विविध समस्या सोडवायच्या असतील तर ग्रँथालयांनीच स्वतः सक्षम बनायला हवे. नवीन वाचक कसे वाढतील याचा विचार केला पाहिजे. अर्थकारणाबद्दल विचार करताना आपले आर्थिक स्रोत कसे वाढतील ? हे पाहिले पाहिजे. सर्व गोष्टी शासनाने द्याव्यात असा आग्रह ठेवला तर मग आपण काय करणार आहोत ? याचा विचार व्हायला हवा.

सध्याच्या तरुणाईला त्यांच्या मोबाईलवर वर्तमानपत्र, पुस्तके जर वाचायला मिळत असतील तर त्यांनी वाचनालयात का यावे ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या तरुणाईला वाचनालयात , ग्रँथालयात येण्यासाठी उद्युक्त करावे लागेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. किंडल ई- बुक रीडर सारख्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. तरच वाचनालयाचे सभासद वाढतील आणि आर्थिकदृष्टया सक्षम होता येईल. त्यासाठी नियोजन करण्याबरोबरच नवीन उपक्रम राबविण्यासाठी धाडस करावे लागेल. आमदार या नात्याने शासन दरबारी निश्चितच कर्मचाऱ्यांच्या तसेच अन्य समस्या मांडल्या जातील . असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.

यावेळी प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रँथालय संघाचे कार्यवाह मंगेश मसके यांनी ग्रँथालयांच्या विविध समस्या मांडल्या . सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. अधिवेशनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रँथदिंडी काढण्यात आली. तसेच वाचनाचे महत्व सांगणारे पथनाट्यही सादर करण्यात आले.

पुरस्कार वितरण !

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रँथालय संघाच्यावतीने जाहीर करण्यात आलेले जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये आदर्श ग्रँथालय पुरस्कार मधु मंगेश कर्णिक वाचनालय, करूळ, कणकवली व श्री शिवाजी वाचन मंदिर भरड, मालवण, आदर्श ग्रँथालय कार्यकर्ता पुरस्कार डी. पी.तानावडे(कणकवली ) व गजानन वालावलकर(मालवण), आदर्श ग्रँथालय सेवक पुरस्कार सिद्धी रानडे( पुरळ) व मिनेश तळेकर( तळेरे) यांचा समावेश होता.

Web Title: Try to be financially capable: Nitesh Rane's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.