शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी तृप्ती मुळीकचे पोलिस दलातून निलंबन, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:02 IST

कोल्हापूर पोलिसांकडून अटक, तीन दिवसांची कोठडी

सिंधुदुर्गनगरी : ८५ लाखांची फसवणूक, नरबळी व जादुटोणा आदींचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरपोलिसांनी अटक केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील पोलिस चालक कर्मचारी तृप्ती मुळीक हिचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी निलंबन केले आहे. तिला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी तिच्या निलंबनाची कारवाई केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत अशा अतिमहनीय व्यक्तींना असलेल्या डीव्ही कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली होती. कोल्हापूर येथील या फसवणूक प्रकरणात तिचा हात असल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता.गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलिस ठाण्यात आपल्याला झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एकूण नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक (३२ रा. मूळ दरवेश पाडळी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर व सध्या राहणार सिद्धिविनायक पार्क, दुसरा मजला, ओरोस) या सहा नंबरच्या संशयित आरोपी आहेत.तृप्ती मुळीक हिच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत असे एकूण नऊ आरोपी आहेत. या सर्वांवर भादवि. कलम ३८४, ३८६, ४१९, ४२०, ३४ सह नरबळी इतर अमानूष अघोरी प्रथा व जादुटोणा आदीचा वापर करून ८४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

रोख रकमेसह, दागिने आणि किमती सामानाची फसवणूक२४ लाख ८५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने, दोन लाख ८० हजार किमतीचे चांदीचे दागिने व किमती वस्तू, ५४ लाख ८४ हजार रोख रक्कम व आरटीजीएस रक्कम, दोन लाखांचे लाकडी व किमती सामान, वीस हजार किमतीची परवाना बंदूक अशी रोख रक्कम व दागिन्यांसह किमती सामान फसवणूक करून दबाव टाकून घेतल्याचे व यात आपली या संशयित आरोपींनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

१४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीअटक झालेल्या व आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातून निलंबन झालेल्या तृप्ती मुळीक हिला न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीमुळे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार तिचे निलंबन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसfraudधोकेबाजी