शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 11:51 IST

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास निता व्होल्वो खाजगी आराम बस, आयशर टेंम्पो व दुचाकीस्वार यांच्यात तिहेरी विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला तर आयशर टेम्पो मधील चालकाच्या पायाना गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

ठळक मुद्देतिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राणनांदगाव ओटवफाटा येथील घटना ७ रोजी रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशारा

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास निता व्होल्वो खाजगी आराम बस, आयशर टेंम्पो व दुचाकीस्वार यांच्यात तिहेरी विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला तर आयशर टेम्पो मधील चालकाच्या पायाना गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनास्थळी नांदगांव ग्रामस्थ तसेच कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, महामार्ग पोलीस यांनी जखमींना हलवण्यात तसेच महामार्ग सुरळीत करण्यास मदत केली. काही काळ महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.पुणे येथून सुट्टीनिमित्त गोवा फिरण्यासाठी निता (व्होल्वो) आराम बस गोव्याच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे आली असता सावंतवाडीहून आयशर टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता.

या दोन वाहनात भिषण टक्कर होवून अपघात झाला आणि यात टेपोच्या मागोमाग येत असलेला दुचाकीस्वार दीपक जर्नादन राणे (वय ४५ रा. कोळोशी बाजार) हे टेंम्पोच्या खाली सापडून जागीच गतप्राण झाला. तर आयशर चालक जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.मृत दुचाकीस्वार दीपक राणे यांच्या पश्चात आई ,पत्नी ३ मुली असा परिवार आहे. तिवरे डामरे येथे त्यांची बाग असल्याने दरदिवशी ते सकाळी पाणी शिंपण्यासाठी जात असत आज ते लवकर पाणी शिंपून परतले असता नांदगाव ओटव फाटा दरम्यान अपघात झाला. नांदगाव व कोळोशी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आंदोलनाचा इशारामहामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे सव्हीस रस्ते खड्डेमय व त्यांच्या चुकीमुळेच अपघात घडल्याचे पडसादही नांदगांव ग्रामपंचायतीच्या सभागृहात उमटले. नांदगाव ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून नांदगांव सरपंच यांनी या साठी ७ जानेवारी रास्ता रोको चा इशारा दिला असून हे आंदोलन नांदगांव तिठा येथे होणार असून नांदगांव परिसरातील जनतेलाही या आंदोलनात सहभागी करून घेणार असल्याचे नांदगांव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी बोलताना सांगीतले. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग