कंटेनर न्यूट्रल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस रिव्हर्स ; दुचाकी चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 05:57 PM2019-11-18T17:57:59+5:302019-11-18T18:29:32+5:30

कंटेनर न्यूट्रल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच त्यांनी बस रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बसच्या मागाहून डोंगरपाल येथील युवक दुचाकीवरून येत होता. बस रिव्हर्स येत असल्याचे पाहून संभाव्य धोका ओळखून युवकाने दुचाकीवरून रस्त्याबाहेर उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.

A triple accident on the nose of Banda-Patradevi | कंटेनर न्यूट्रल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस रिव्हर्स ; दुचाकी चालक बचावला

कंटेनर न्यूट्रल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस रिव्हर्स ; दुचाकी चालक बचावला

Next
ठळक मुद्देउभा असलेला कंटेनर न्यूट्रल झाल्याने घडला प्रकारबांदा-पत्रादेवी नाक्यावर तिहेरी अपघात :

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर पत्रादेवी पोलीस तपासणी नाक्याच्या बाजूला कोल्हापूरकडे जाणाऱ्या थांबवून ठेवलेल्या कंटेनरमुळे तिहेरी अपघात घडला. दुचाकी बसच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संभाव्य धोका ओळखून दुचाकी चालकाने रस्त्याबाहेर उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पत्रादेवी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात शनिवारी रात्री उशिरा घडला.

गोव्यातून कोल्हापूरकडे जाणारा कंटेनर संबंधित चालकाने महामार्गावर मार्गालगत उतारावर उभा करून तो तपासणी नाक्यावर कागदपत्रे तपासणीसाठी घेऊन गेला. मात्र, कंटेनर न्यूट्रल झाल्याने हळूहळू मागे येऊ लागला. बांद्याच्या दिशेने येणारी गोव्यातील बस ट्रकच्या मागोमागच होती. कंटेनर न्यूट्रल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच त्यांनी बस रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बसच्या मागाहून डोंगरपाल येथील युवक दुचाकीवरून येत होता. बस रिव्हर्स येत असल्याचे पाहून संभाव्य धोका ओळखून युवकाने दुचाकीवरून रस्त्याबाहेर उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.

वाद उद्भवला
अपघातानंतर दुचाकीच्या नुकसानभरपाईवरून बरेच वाद रंगले होते. अपघातग्रस्त दुचाकी बसखाली आल्याने भरपाई बस चालकाने द्यावी अशी भूमिका कंटेनर चालकाने घेतल्याने वाद उद्भवला. रविवारी सायंकाळपर्यंत कंटेनर घटनास्थळी होता. आजरा येथून कंटेनर मालक आल्यानंतरच तोडगा निघणार आहे.

 

अपघातात युवक गंभीर

देवगड : देवगड-मालवण सागरी मार्गावर कातवण द्वारकानगरी येथे  दुचाकी व  पर्यटकांच्या गाडीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात मिठबांव डगरेवाडी येथील संजय तातू डगरे (२८) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. खड्डे चुकविताना हा अपघात झाला.

मिठबांव डगरेवाडी येथील संजय डगरे हा रविवारी कातवण येथे बागेत दुचाकीने जात होता. मिठबांव कातवण मार्गावर द्वारकानगरी येथे खड्डा चुकविताना कुणकेश्वरहून मालवणकडे जाणाºया पुणे येथील पर्यटकांच्या गाडीला धडक बसली.  अपघातात संजय याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात झाल्याचे समजताच मिठबांव येथील रामेश्वर प्रतिष्ठानचे भाई नरे, प्रदीप मिठबांवकर आदी पदाधिकाºयांनी रूग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी असलेल्या संजय डगरे याला प्रथम मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गंभीर दुखापत असल्याने प्रथमोपचार करून त्याला तत्काळ कणकवली येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. देवगड पोलीस स्टेशनचे आगा यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला.

Web Title: A triple accident on the nose of Banda-Patradevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.