झाड कोसळून घर जमीनदोस्त, गणेश प्रतिष्ठापना केलेला भाग मात्र सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 05:43 PM2019-09-04T17:43:23+5:302019-09-04T17:44:38+5:30

परमे येथील लक्ष्मण जाधव यांच्या घरावर वडाचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलेला घराचा भाग मात्र सुस्थितीत राहिल्याने मूर्तीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

The tree fell and the house collapsed | झाड कोसळून घर जमीनदोस्त, गणेश प्रतिष्ठापना केलेला भाग मात्र सुरक्षित

परमे येथे वडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झाले.

Next
ठळक मुद्देवडाचे झाड कोसळून घर जमीनदोस्त गणेश प्रतिष्ठापना केलेला भाग मात्र सुरक्षित

दोडामार्ग : परमे येथील लक्ष्मण जाधव यांच्या घरावर वडाचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलेला घराचा भाग मात्र सुस्थितीत राहिल्याने मूर्तीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

ही दुर्घटना घडली तेव्हा जाधव कुटुंबीय गणरायांसमोर आरती करीत होते. केवळ सुदैवानेच ते बचावले. मंगळवारी परमे येथील लक्ष्मण जाधव व त्यांचे कुटुंबीय गणरायाची आरती करण्यात व्यस्त होते.

याच दरम्यान त्यांच्या घरावर वडाचे झाड कोसळले आणि संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. केवळ गणेशाची मूर्ती स्थापन केलेला भाग सुरक्षित राहिला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आरती करीत असतानाच हा प्रसंग ओढवल्याने या दुर्घटनेतून जाधव कुटुंबीय वाचले. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे.

 

Web Title: The tree fell and the house collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.