Sindhudurg: आंबोली घाटात झाड कोसळले, वाहतूक काही काळ ठप्प
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 19, 2025 12:15 IST2025-06-19T12:14:31+5:302025-06-19T12:15:35+5:30
वाहनांच्या लांबच लांब रांगा

Sindhudurg: आंबोली घाटात झाड कोसळले, वाहतूक काही काळ ठप्प
आंबोली : आंबोली घाटमार्गावरील देवसू पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक एक झाड कोसळल्यामुळे सुमारे दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी वाहने रस्त्यावरच अडकून पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर ग्रामस्थांनी जेसीबी बोलावून झाड बाजूला हटविल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
पावसाळा सुरु झाला की रस्त्याच्या बाजूची धोकादायक झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे संबंधित विभागाने घाटरस्त्यातील अशी धोकादायक झाडे, फांद्या तोडाव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत. त्यातच आंबोली घाट परिसरात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे जमीनही दलदलयुक्त बनली असल्याने थोडासा जरी वारा सुटला की झाडे धडाधड कोसळतात. त्याचा फटका मग वाहतूकदारांना बसतो.