शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने दहा म्हशींना चिरडले

By admin | Updated: September 7, 2014 00:35 IST

साकेडीजवळ कोकणकन्या एक्स्प्रेसला अपघात : रेल्वेवाहतूक विस्कळीत

कणकवली : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसने साकेडी फाटकानजीक दहा म्हशींना चिरडले. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या सर्व म्हशी जानवली येथील शेतकऱ्याच्या असल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली.कोकणकन्या एक्स्प्रेस अकरा वाजता साकेडी फाटकावर आली असता रेल्वेच्या मोटरमनला समोर ट्रॅकवर चालणाऱ्या दहा म्हशी दिसल्या. त्याने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र गाडीला वेग असल्याने दहाही म्हशींना ठोकर बसली. काही म्हशी रेल्वेखाली चिरडल्या, तर काही ठोकर बसून बाजूला उडाल्या. गाडीच्या इंजिनखाली आणि डब्यांखाली म्हशी अडकल्या होत्या.या म्हशी जानवली येथील रेल्वेट्रॅकपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील असल्याचे स्थानिकांनी सांगितले. म्हशींच्या राखणदाराची नजर चुकल्याने त्या भरकटल्या व ट्रॅकवर आल्या. अपघात झाल्यानंतर राखणदार पळून गेला. अपघातानंतर ‘कोकणकन्या’ घटनास्थळीच थांबली होती. रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने अपघात घडलेल्या ठिकाणी दाखल झाले. इंजिन व डब्यांखाली अडकलेल्या म्हशींना बाहेर काढण्यात आले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या मार्गस्थ करण्यात आली. या घटनेमुळे कणकवली रेल्वेस्थानकात दिवा व ओरोस स्थानकांत मांडवी एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)चाकरमान्यांची तारांबळ...गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना अचानक आज, शनिवारी सकाळी कोकणकन्याने दहा म्हशींना चिरडले. या अपघातामुळे सुमारे दोन तास कोकणकन्या रखडली होती. यामुळे कणकवली रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती.