शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; किनारपट्टीवरील कनेक्शन आलं समोर, लवकरच रॅकेटचा उलगडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 19:27 IST

आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली

संदीप बोडवेमालवण: सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबी च्या पथकाने आज, शनिवारी मालवण येथून निलेश रेवंडकर यांच्या सह मालवण पोलिसांनी निलेश याच्याकडून जप्त केलेले १८.६०० किलोचे अम्बरग्रिसही आपल्या ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आता पर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे २४ किलोचे अम्बरग्रिस जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २४ कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे.सांगली येथील एलसीबीच्या पथकाने बुधवारी (दि. ८) सांगली येथील शामराव नगर परिसरात सापळा रचून तस्करी साठी आणलेली ५.६०० किलोग्रॅम वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. त्या बरोबर सलीम गुलाब पटेल (वय ४९, रा. खणभाग, सांगली) व अकबर याकूब शेख ५१, रा. पिंगळी कुडाळ, सिंधुदुर्ग) यांनाही अटक करण्यात आली होती. संशयितांकडे कसून चौकशी केली असता तस्करीसाठी आणण्यात आलेली व्हेलची उलटी मालवण तळाशिल येथील निलेश रेवंडकर यांच्या जवळील असल्याचे तपासात समोर आले होते. दरम्यान गुरुवारी (दि.९) रोजी रात्री मालवण येथील पोलिस हेड कॉन्स्टेबल सुशांत पवार, व एच व्ही पेडणेकर यांच्या पथकाने तळाशिल, मालवण येथून निलेश प्रकाश रेवंडकर यांच्या कडून वाळूत लपवून ठेवलेली १८.६०० किलो वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. या कारवाई बाबतची  माहिती मालवणं पोलिसांनी सांगली येथील एलसीबी च्या पथकाला दिली होती.लवकरच रॅकेटचा उलगडा सांगली एलसीबी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पीएसआय महादेव पोवार, पीएसआय विशाल येळेकर व त्यांचे पथक शनिवारी मालवण येथे दाखल झाले. त्यांनी निलेश रेवंडकर यांच्यावर अटकेची कारवाई करतानाच त्यांच्याकडे सापडून आलेली आणि मालवण पोलिसांच्या ताब्यात असलेली व्हेलची उलटी आपल्या ताब्यात घेतली.आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्यात आली असून वन्य जीव तस्करी प्रकरणातील रॅकेटचा लवकरच उलगडा करण्यात येतील असा विश्वास सपोनी संदीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस