वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी कोरोनावर केली मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:08 IST2020-09-30T14:05:53+5:302020-09-30T14:08:28+5:30
कणकवली तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कणकवली पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनावर मात करत ते नव्या दमाने पुन्हा मंगळवारी सेवेत दाखल झाले आहेत.

वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी कोरोनावर केली मात !
ठळक मुद्देपुन्हा सेवेत झाले दाखलपोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी केले स्वागत
कणकवली : कणकवली तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कणकवली पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनावर मात करत ते नव्या दमाने पुन्हा मंगळवारी सेवेत दाखल झाले आहेत.
कणकवली पोलिस ठाण्यात विश्वजीत परब सेवेत हजर झाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात,विनायक चव्हाण, ममता जाधव यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.