लाखो रुपये खर्चून बंधा-यात पाणीच नाही  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 03:23 PM2017-12-24T15:23:57+5:302017-12-24T15:24:16+5:30

Took millions of rupees to spend- There is no water in it | लाखो रुपये खर्चून बंधा-यात पाणीच नाही  

लाखो रुपये खर्चून बंधा-यात पाणीच नाही  

Next

सावंतवाडी - आरोस-हरिजनवाडी  येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणी साचत नसल्याने तेथील साडेतीनशे कुटुंबीयांच्या बागायती ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी  बागायतदारांमधून होत आहे. 
आरोस-हरिजनवाडी येथे शेतक-यांच्या बागायतींना पाणी  उपलब्ध व्हावे यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सुरुवातीला या बंधाºयात पाणी साचत होते.  मात्र, अलीकडे या बंधा-याला गळती लागल्याने प्लास्टिक पिशवीत दगड-माती भरून पाणी अडविण्याचा प्रयत्न करूनही पाणी बंंधा-यात साचत नाही.
या बंधा-यावर आरोस गावातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांच्या बागायतींचे भवितव्य अवलंबून आहे. या बागायतींवर शेकडो बागायतदार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या बागायती पाण्याविना नष्ट झाल्यास बागायतदारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे.  त्यामुळे संबंधित विभागाने या बंधा-याबाबत ठोस पावले उचलून बंधाºयाची डागडुजी करावी, अशी मागणी मळेवाड शिवसेना विभागप्रमुख तथा आरोस तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांनी केली.

Web Title: Took millions of rupees to spend- There is no water in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.