सिंधुदुर्गात आज तब्बल १५२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, पाच जणांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 19:23 IST2021-04-19T19:17:09+5:302021-04-19T19:23:08+5:30
CoronaVirus Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी १५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. पाच रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्गात आज तब्बल १५२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, पाच जणांचा मृत्यु
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी १५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. पाच रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३३३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. ही आकडेवारी आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.