शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्राथमिक शाळा देशात चमकणार

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभाग : स्वच्छ भारत अभियान

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन शाळा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर चमकणार आहेत़ त्या शाळांचे चित्रीकरण करुन त्यांचा अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे़ हे अभियान सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे़ आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानामध्ये तसेच शैक्षणिक दर्जाबाबत राज्यामध्ये नाव कमावलेले आहे. त्यानंतर आता या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषदेला नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळा जोरदारपणे राबवत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून पाहणी करण्यात येणार आहे़ तसेच अशा शाळांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे़ याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे़ या अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची निवड शिक्षक विभागाने केली आहे़ त्यामध्ये लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ आणि संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर शाळा क्रमांक १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायले या शाळांचा समावेश आहे़ या शाळांचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, त्याबाबतची तयारी करण्याची सूचना निवड करण्यात आलेल्या तिन्ही शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी दिली. निवड करण्यात आलेल्या शाळा देशात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (शहर वार्ताहर)लांजा क्रमाक ५, पूर शाळा क्ऱ १, सायले.नोव्हेंबरमध्ये चित्रिकरण होणार.स्वच्छ भारत अभियान.जिल्ह्यातील सर्व शाळांचा अभियानामध्ये सहभाग.केंद्र शासनाला अहवाल सादर होणार.