शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

सोनाळीत तीन शिका-यांना पकडले, दोन बंदुका आणि सात काडतुसे जप्त;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 8:26 PM

वैभववाडी (सिंधुदुर्ग):शिकारीला गेलेल्या तिघांना पहाटे सोनाळीत अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन बंदुका आणि 7 जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ठळक मुद्दे न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) :  शिकारीला गेलेल्या तिघांना पहाटे सोनाळीत अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन बंदुका आणि 7 जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. ते शिमग्याच्या गाव पारधीसाठी गेले होते. विभागीय गस्तीवर असलेले कुडाळचे पोलीस निरीक्षक ए. एल. भोसले यांनी ही कारवाई केली.

     याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, कुडाळचे पोलीस निरीक्षक ए. एल. भोसले विभागीय गस्तीवर होते. पहाटे 3 च्या सुमारास सोनाळीत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पो जवळ त्यांना 5 ते 7 लोकांचा घोळका दिसला. त्यामुळे थांबून चौकशी केली. त्यावेळी सोनाळीतील सदानंद मोतीराम पाडावे(47) व लवू परशुराम नर(34) यांच्या ताब्यात दोन काडतुस बंदुका आणि 7 जीवंत काडतुसे आढळून आली.    त्यापैकी नर याच्या ताब्यातील बंदुक ही कोकिसरेतील जगन्नाथ सहदेव गुरव याची होती. त्यामुळे बंदुका आणि काडतुसांसह पाडावे आणि नर यांना ताब्यात घेत गुरवसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवीत दोघांनाही तात्काळ अटक केली. त्यानंतर सकाळी जगन्नाथ गुरव याला अटक केली. त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. घाडगे करीत आहेत.