कणकवलीत राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत तीन म्हशी ठार, पुन्हा रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
By सुधीर राणे | Updated: October 2, 2023 13:13 IST2023-10-02T13:12:23+5:302023-10-02T13:13:10+5:30
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसून हळवल रेल्वे फाटकापासूनजवळ तीन म्हशी जागीच ...

कणकवलीत राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत तीन म्हशी ठार, पुन्हा रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसून हळवल रेल्वे फाटकापासूनजवळ तीन म्हशी जागीच ठार झाल्या. यात एका दुभत्या म्हशीचा समावेश आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
कणकवली रेल्वे स्थानकातून राजधानी एक्स्प्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाल्यानंतर अचानक मृत म्हशी रेल्वे ट्रॅकवर आल्याने ही घटना घडली. त्यानंतर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस हळवल रेल्वे फाटकापासून जवळच असलेल्या वागदे रेल्वे पुलाजवळ उभी होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले आदींनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशीचे मृतदेह बाजूला केले. या घटनेबाबत रेल्वेचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाला कळविण्यात आले. तेही घटनास्थळी दाखल झाले होते.