कलमठ येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घर, फ्लॅट फोडले, बंद घरांना केले लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:02 IST2019-09-23T17:00:58+5:302019-09-23T17:02:09+5:30
कणकवली पोलीस स्थानकापासून काही अंतरावर कलमठ बिडयेवाडी येथे चार ते पाच ठिकाणी घरे व प्लॅटला चोरट्यांनी लक्ष्य केले. सर्वच घरे बंद असताना चोरट्यांनी ती फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे़ चोरी झालेल्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने नेमका किती माल चोरीला गेला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.

कलमठ येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घर, फ्लॅट फोडले, बंद घरांना केले लक्ष्य
कणकवली : कणकवली पोलीस स्थानकापासून काही अंतरावर कलमठ बिडयेवाडी येथे चार ते पाच ठिकाणी घरे व प्लॅटला चोरट्यांनी लक्ष्य केले. सर्वच घरे बंद असताना चोरट्यांनी ती फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे़ चोरी झालेल्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने नेमका किती माल चोरीला गेला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.
या चोरीनंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. मात्र, घरमालकांची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कलमठ बिडयेवाडी येथील संजय सावंत यांच्या साईलिला बंगल्यात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडत प्रवेश केला. त्यांच्या बंगल्यातील कपाट फोडून ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे़
कणकवली पोलिसांची घटनास्थळी भेट; नोंद नाही
राजाराम देसाई व अन्य दोघांची घरे तसेच काही प्लॅटमध्ये घुसून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. कणकवली पोलिसांनी या चोरीच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात या चोरीबाबत नोंद झालेली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती समजली नाही.