चोरट्यांनी सात घरे फोडली, कणकवली शिवाजीनगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:53 IST2019-07-24T15:51:46+5:302019-07-24T15:53:19+5:30
जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे घरफोडीने पोलीस यंत्रणा त्रस्त झाली असून या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

कणकवली शहरातील शिवाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात घरे फोडून कपाटातील माल लंपास केला.
कणकवली : जोरदार पडणारा मुसळधार पाऊस व अंधार याचा फायदा घेत कणकवली शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पुन्हा सात घरे फोडली. कणकवलीत चोरांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे घरफोडीने पोलीस यंत्रणा त्रस्त झाली असून या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.
कणकवली शहरातील भरवस्तीत असलेल्या शिवाजीनगर येथील राजरत्नम पणामकर, रंजना सावंत, वासुदेव मोंडकर, शैलेश तांबे, विकास पाटील, प्रगती पाटकर, बळीराम आडेलकर या सात जणांच्या घरी चोरी झाली आहे. कोणाचा किती मुद्देमाल गेला याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र पोलिस घटनास्थळी येऊन तपास करीत आहेत. चोरट्यांनी या सातही घरांमधील कपाटे लॉकर फोडून चोरी केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागात चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांनी पुन्हा एकदा रेल्वेस्थानका नजिकचे आणि महामार्गावरील कणकवली शहर टार्गेट केल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.