शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:27 IST

मंदिराची करण्यात आली होती रेकी

कणकवली : जानवली, कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरांमधील धातूची मूर्तीच अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.  दरम्यान, सायरन वाजताच चोरट्यांनी पाच काडतूस भरलेले गावठी रिव्हॉल्वर व कटावणी घटनास्थळीच टाकून पळ काढला. या घटनेमुळे कणकवली परिसरात खळबळ उडाली. काल, शुकवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.कणकवली पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तपासासाठी पथके कार्यरत करण्यात आली असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.कणकवली तालुक्यातील जानवली येथे मुंबई - गोवा महामार्ग लगत असलेल्या कृष्णनगरी या ठिकाणी हे स्वयंभू दत्त मंदिर २०१९ मध्ये उभारण्यात आले होते. ओंकार मोहिते यांच्या खासगी मालकीचे हे मंदिर असून घरातील एका खोलीमध्ये जमिनीत ही मूर्ती मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या ठिकाणी स्वयंभू दत्त मंदिराची उभारणी केली. चोरीबाबत मोहिते यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराची करण्यात आली होती रेकीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी या मंदिराजवळ चौघे तरुण आले होते. यातील एकाने मोहिते यांना मला ओळखलं काय? असं विचारून या मंदिरात असलेल्या दत्त मूर्तीचे दर्शन देखील घेतले होते. तसेच या ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग करत फोटोही घेतले होते. त्यानंतर त्यांनी मंदिरातील मूर्ती सोन्याची आहे का? अशी विचारणा केली होती. त्यानंतर चोरीच्या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केले असता त्यामध्ये संशयित तिघेजण व तीन तारीखला आलेल्या तरुणांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती आढळत असल्याचेही पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.सायरन वाजताच चोरटे पसारकटावणीच्या साहाय्याने चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून ही मूर्ती पळवली. मात्र, याच दरम्यान सीसीटीव्हीला कनेक्ट असलेला सायरन वाजल्याने मोहिते कुटुंबीय घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनी मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर काही वेळातच चोरटे तेथून पळाले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.