शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लागेल तेव्हा सत्ता नसेल, तेव्हा..; मनसे नेत्याचा नितेश राणेंना सवाल

By सुधीर राणे | Updated: December 15, 2022 19:14 IST

विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे मतदारांना मतांसाठी असेच धमकावणार का?

कणकवली : माझे मनसे पक्षातील पद टिकवण्याबद्दल सल्ला देण्यापेक्षा आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी त्यांच्या वडिलांना आम्ही वेळोवेळी दिलेले सल्ले आधी जाणून घ्यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे मतदारांना मतांसाठी असेच धमकावणार आहेत काय ?असा प्रतिटोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांना लगावला.  आमदार म्हणून समानतेने वागण्याची सभागृहात घेतलेल्या शपथेचा विसर नितेश राणे यांना पडला आहे. त्यामुळेच त्यांनी नांदगाव येथे निधीबाबतचे वक्तव्य केले आहे. जेव्हा विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा मतदारांना सामोरे जाताना नितेश राणे यांच्याकडे सत्ता नसेल. त्यावेळी ते मतदारांसमोर कोणते वक्तव्य करणार असा सवालही उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे यांनी मतदारांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्यावर परशुराम उपरकर यांनी टीका टिप्पणी केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून परशुराम उपरकर यांनी प्रतिटोला लगावला आहे. ते म्हणाले,  नितेश राणेंनी स्वतःचे वडील जेव्हा प्रथम आमदार झाले तेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते हे आधी लक्षात घ्यावे. मग तेव्हा सत्तेत नसलेले व विरोधी आमदार असलेल्या नारायण राणेंनी जिल्ह्याचा विकास केला नाही असे नितेश राणेंना म्हणायचे आहे काय ? हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना राज्य आणि केंद्रातील अनेक नेते भेटत असतात. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंची सदिच्छा भेट नितेश राणे यांनी घेतली. त्यामुळे आपले चांगले संबध त्यांच्याबरोबर आहेत असे नितेश राणेंना वाटत असेल. मात्र, त्यांच्या अथवा कोणाच्याच सांगण्याने राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. हे राणे यांनी लक्षात घ्यावे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा