शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

कोकम पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था, बाजारपेठेत योग्य दर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:17 IST

बाळकृष्ण सातार्डेकर  रेडी ( सिंधुदुर्ग ) : रतांबे अर्थात कोकमचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या आधी ...

ठळक मुद्देकोकम पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्थाबाजारपेठेत योग्य दर नाही : रतांब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात

बाळकृष्ण सातार्डेकर रेडी (सिंधुदुर्ग) : रतांबे अर्थात कोकमचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या आधी जास्तीत जास्त पीक ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिसत आहेत. कोकमच्या व्यवसायातून येथील शेतकºयाला दोन महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. पण कोकम उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हवा तसा दर बाजारपेठेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये या व्यवसायाबाबत अनास्था वाढत चालली आहे.उन्हाळी हंगामात आंबा, काजू व कोकम ही तीन महत्त्वाची फळेकोकणातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पहायला मिळतात. या दिवसात येणाऱ्या पर्यटक व पाहुण्यांचे आगळेवेगळे स्वागत काजूगर, आंबा, फणसाचे गरे व कोकम सरबत देऊन केले जाते.

पण आंबा व काजू या दोन फळाप्रमाणे कोकमसाठी म्हणाव्या तशा प्रमाणात चांगली बाजारपेठ व प्रसिद्धी मिळत नसल्याने या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. या फळापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.कोकमचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रतांब्यापासून ओली आमसुले, (आगळी सोले), कोकम सरबत, जेवणानंतर पचनासाठी सोलकढी आदी विविध उत्पादने घेतली जातात. सध्या बाजारपेठेत आमसुले आगळी सोले १५० ते १६० प्रतिदराने, कोकम मुटले ३० रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहेत.कोकम तयार करण्याची पद्धतकोकम तयार करताना सर्वप्रथम लाल झालेला रतांबा मजुरांकरवी काढावा लागतो. त्यानंतर तो घरी आणून घरातील माणसे तसेच मजूरवर्ग लावून त्या फळांचा रस, बिया व पाकळ््या वेगळ््या केल्या जातात. पाकळ्या वेगळ््या केल्यानंतर त्या चारवेळा आगळ रसामध्ये भिजवून कडक उन्हात सुकविल्या जातात. यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी जातो. तयार झालेली आमसुले जवळील बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात.कोकम उत्पादनेआमसुले (आगळी सोला) : सर्वसामान्य घरापासून ते पंचरातांकित हॉटेलमध्ये मच्छीकढी, आमटी, कालवण व सोलकढीला उत्कृष्ट चव येण्यासाठी व मच्छीकढी उकळताना प्रमाणानुसार आत आमसुले टाकली जातात. पित्त झाले तर आमसुले पाण्यात भिजवून लावतात. कोकम रस व कोकम सरबत पिण्यासाठी दिला जातो.

मुटले : कोकमच्या बियापासून तयार केलेल्या मुटल्याचा वापर आहारात चपातीवर कडवन तेल म्हणून केला जातो. थंडीच्या दिवसात पायांना, ओठांना भेगा पडल्यास मुटले कडवून घासून लावल्यास भेगामधील दाह शांत होऊन भेगा बऱ्या होतात.

टॅग्स :fruitsफळेkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग