सावंतवाडीत कापड दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:39 IST2019-09-19T16:37:38+5:302019-09-19T16:39:06+5:30

सावंतवाडी नगरपरिषद संकुलातील अरुण ताम्हणेकर यांच्या कापड दुकानात कपड्यांची चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपडे लंपास केले. 

Theft at a cloth shop in Sawantwadi | सावंतवाडीत कापड दुकानात चोरी

सावंतवाडीत कापड दुकानात चोरी

ठळक मुद्देसावंतवाडीत कापड दुकानात चोरीपोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद संकुलातील अरुण ताम्हणेकर यांच्या कापड दुकानात कपड्यांची चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपडे लंपास केले. 

ताम्हणेकर यांच्या कापड दुकानात रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्याने लोखंडी ग्रील कापून दुकानाच्या वरील भागातून प्रवेश करीत कपड्यांची चोरी केली. तसेच या चोरट्याने कपडे अस्ताव्यस्त फेकले. दुकानात ताम्हणेकर यांनी पैसे न ठेवल्याने चोरट्यांच्या हातात काही सापडू शकले नाही.

याप्रकरणी ताम्हणेकर यांनी बुधवारी सकाळी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली असता पोलीस उपनिरीक्षक अमित गोते व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ठसे तज्ज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Theft at a cloth shop in Sawantwadi