शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पार्टी जिवावर बेतली, मित्रानेच केला मित्राचा खून; मुख्य संशयित ताब्यात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 12, 2024 17:14 IST

२४ तासांत पोलिसांकडून घटनेचा छडा

बांदा : पार्टीत झालेल्या वादातून खुर्ची डोक्यात मारल्यामुळे भालावल-फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर (वय ४८) या तरुणाचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. बुधवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुख्य संशयित चेतन रवींद्र परब (३५, भालावल) याला सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली, तर पार्टीत सहभागी असलेल्या अन्य सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.याबाबत मृत संतोष यांचा पुतण्या नितीन महेश गुळेकर यांनी बांदा पोलिसात तक्रार मंगळवारी दिली. मृताचे घर व ज्याठिकाणी पार्टी झाली ते ठिकाण अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले व उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत संपूर्ण दिवस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी संतोष याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरीत्या आढळला होता. बुधवारी सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले. यामध्ये मृताच्या डोक्यावर डाव्या बाजूला खोलवर गंभीर वार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संतोष याचा खूनच झाल्याची पुष्टी मिळाली. त्यानंतर बांदा पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरविली.

अन्य सहा जणांची नावे उघडबांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ भालावल येथे दाखल झाले. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेक्षणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, बांदा पोलिस पथक यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मुख्य संशयित चेतन परब याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. त्याने आपणच मृताला दारूच्या नशेत प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांना दिली. यावेळी आपल्यासोबत रविवारी अन्य सहा जण पार्टीत सहभागी असल्याची माहिती दिली, तसेच त्यांची नावे चौकशीत उघड केली.

पोलिसी खाक्या दाखविताच दिली माहितीमुख्य संशयिताने दिलेल्या माहितीनुसार बांदा पोलिसांनी सहाही जणांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. सुरुवातीला ते संदिग्ध माहिती देत होते. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पार्टीत घडलेली सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

पार्टीत झाली मारामारीरविवारी भालावल येथे मुख्य संशयित चेतन यांच्या निवासस्थानी पार्टीसाठी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हे सर्व जण एकत्र आले होते. पार्टी मद्याचा समावेश असल्याने पार्टी उत्तरोत्तर रंगत गेली. यावेळी संशयित चेतन व मयत संतोष यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. चेतन याने संतोषला प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यावर खुर्चीचा जोरदार प्रहार केला. यामध्ये तो विव्हळला. त्याने जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याच्या बेतात असताना तो घराच्या मागील पडवीत जाऊन कोसळला. त्यानंतर सर्वानी तेथून पोबारा केला. त्यानंतर संतोष हा आपल्या घरात मंगळवारी मृतावस्थेत आढळला.मृत संतोष हा संशयितच्या घरी कोसळला तर त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी कसा सापडला हे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्याच्या मृत्यूस अन्य कोणी कारणीभूत आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस