शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत

By अनंत खं.जाधव | Updated: April 25, 2025 17:21 IST

आंबोली: पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा ...

आंबोली: पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत राहिले पाहिजे. पण सरकारने एखादा निर्णय घेतना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही? याची दक्षता घेतली पाहिजे असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मांडले. ते आंबोली येथील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एखाद्या पर्यटकाला त्याचा धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य असल्याचे सांगितले.पवार गुरूवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. आज, शुक्रवारी त्यांनी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकासोबत बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बॅक संचालक व्हिक्टर डाॅन्टस, माजी मंत्री प्रविण भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, ऊस सशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते.परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले पाहिजेपहलगाम येथील हल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. धर्म विचारून एखाद्या पुरूषाला मारणे म्हणजे परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. जे काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नसल्याचे पवार यांनी म्हटले.एखादा निर्णय घेतला तर तडीस न्यावापहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवण्यात आले होते. त्यामुळेच सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा दिला असून सर्वजण सरकार सोबत आहोत. हल्ला भारतावर झालेला आहे त्यामुळेच सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे. पण सरकारने ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. एखादा निर्णय घेतला तर तडीस न्यावा असे आवाहन पवार यांनी केले. काही निर्णय विचार करून घेतले पाहिजेत हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत, पण हे निर्बंध लादत असताना सरकारने थोडासा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानातून जात असताना बंद केली तर त्याचा परिणाम भारतावरच होईल असे अनेक निर्णय आहेत. पण यातून पाकिस्तानला ही एक संदेश जाईल असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात काजूवर नवनवीन प्रकिया उद्योग उभे राहत आहेत याची माहिती घेतली  हे भूषणावह आहे. असे असे असले तरी काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे. हेही  तपासून घेतले पाहिजे. पण संशोधनाचे काम चांगले चालले असल्याचे पवार यांनी म्हटले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान