महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली

By अनंत खं.जाधव | Updated: August 13, 2025 22:48 IST2025-08-13T22:47:44+5:302025-08-13T22:48:42+5:30

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी भेट दिली त्यांचे केसरकर यांनी स्वागत केल.

The meetings of the coordination committee in the Mahayuti are not held on time, Revenue Minister Chandrashekhar Bawankule admitted. | महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली

महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली

सावंतवाडी : महायुतीत कोणतीही नाराजी नाही मात्र वेळेवर समन्वय समितीच्या बैठका झाल्या नसल्याने काही कुरबुरी आहेत पण ही काही टोकाची भांडणे म्हणता येणार नाहीत दोन तीन जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून वाद असल्याची स्पष्ट कबुली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुल्या मनाचे असून ते नाराज नाहीत असेही बावनकुळे म्हणाले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी भेट दिली त्यांचे केसरकर यांनी स्वागत केल.

यावेळी  भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब तालुकाप्रमुख बबन राणे बाबू कुडतरकर गणेशप्रसाद गवस सचिन वालावलकर नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीमध्ये काहीतरी वाद आहेत असे चित्र रंगवले जात आहे पण प्रत्यक्षात कोणताही वाद नाही पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाहीत मुख्यमंत्री ज्याला ज्या जिल्ह्यात पाठवतील तेथे त्यांनी जाऊन ध्वजारोहण करायचे असते.
पण काहि ठिकाणी वाद आहेत पण मोठा वाद नाही चित्र रंगवले जात आहे.हे ही वाद मिटतील फक्त वेळेवर समन्वय समितीच्या बैठका झाल्या नसल्याने काही कुरबुरी आहेत या बैठका झाल्यानंतर सर्व वाद मिटतील असेही बावनकुळे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खुल्या दिलाचे आहेत ते नाराज असूच शकत नाहीत फक्त नाराजीची चर्चा रंगवली जाते  भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्ही सर्वजण समन्वय ठेवून काम करत असतो.प्रत्येकाची काम करण्याची लाईन ठरली आहे असे हीबावनकुळे म्हणाले.

म्हणूनच कोकण निवडला

गेल्या अडीच वर्षात पक्षाचे काम करत असताना सुट्टी घेतली नव्हती पण कुटुंबाला कुठेतरी वेळ दिला पाहिजे म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली आणि सुट्टीचा वेळ कुठे घालवायचा म्हणून कोकण निवडला येथील आंबोलीतील धबधबे उत्कृष्ट आहेत निसर्ग रम्य अशी ठिकाणे आहेत असे बावनकुळे म्हणाले.

Web Title: The meetings of the coordination committee in the Mahayuti are not held on time, Revenue Minister Chandrashekhar Bawankule admitted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.