शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुजाण मतदारांचे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे मत

By अनंत खं.जाधव | Published: September 05, 2023 5:37 PM

सावंतवाडीत लोकशाही जीवन प्रणाली व शिक्षण यावर परिसंवाद 

सावंतवाडी : भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले. परंतु लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले आहे. सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान, बलस्थान आहे असे मत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मांडले.राज्य निवडणूक आयोग, भोसले नॉलेज सिटी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने आज, मंगळवारी भोसले नॉलेज सिटी येथे लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशपांडे बोलत होते.देशपांडे म्हणाले, भारतीय लोकशाहीचा विचार करता अजून काही घटक परीघाबाहेर आहेत त्यांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. आज भारतात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मतदार 5.5% आहेत त्यापैकी 0.68% इतक्याच तरुण मतदारांचे नाव मतदार यादीत आहे हे चित्र बदलले पाहिजे.मतदानाप्रती असलेली उदासीनता ही चिंतेची बाब आहे. युवा मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. या संदर्भात लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही लोकशाही गप्पाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.प्रकाश परब म्हणाले, सध्या समाजाची दोन विभागात विभागणी झाली आहे. आभाषी  समाज आणि डिजिटल समाज अशी ही विभागणी आहे. सोशल मीडियाने जग व्यापले आहे. अशा परिस्थितीत लोकशाही समोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभाग हा लोकशाहीचा आत्मा आहे असे परब यांनी स्पष्ट केले.अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी आपण शेती क्षेत्रात उतरलो रसायनमुक्त अन्नधान्य मिळणे या पुढच्या काळात महत्त्वाचे आहे भविष्यात अन्नाचे दुर्भक्ष जाणवणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतः पुरते का होईना शेती केली पाहिजे कोरोनाचे संकट येईल असे दहा वर्षापूर्वी कोणाला वाटले नव्हते परंतु ते आले हीच बाब अन्नाच्या दुर्लक्षा बाबत होणार आहे असे सांगितले.या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार  जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी, हसन खान हे युवा प्रतिनिध सहभागी झाले होते.तर जिल्हाधिकारी किशोर तावडे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील भोसले नॉलेज सिटी चे अच्युत सावंत भोसले यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdemocracyलोकशाहीElectionनिवडणूकVotingमतदान