शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:34 IST

कणकवली: झपाट्याने काम करणारे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद ...

कणकवली: झपाट्याने काम करणारे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद करून दिली आहे. बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी २४० कोटींची तरतूद केली आहे. दोन्ही खात्यांचे मिळून ७२४ कोटी रुपयेची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे कोकणातील मत्स्य व्यवसायिकांसाठी तसेच बंदर विकासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्यांसाठी अर्थसंकल्पातील आत्तापर्यंतची सर्वात जास्त तरतूद केली आहे. मत्स्य व्यवसाय वाढीसाठी तसेच बंदर विकासासाठी मंत्री नितेश राणे यांनी गेल्या शंभर दिवसाच्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्यांच्या कामाची दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यासंदर्भात निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने अर्थसंकल्पात तो दिसून आला. बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी २४० कोटी असे मिळून ७२४कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात अनेक कामाचा समावेश होणार आहे. बंदर विकासाबरोबरच मच्छीमारांचे प्रश्न सुद्धा या माध्यमातून सूटणार आहेत. मुंबईतील बंदरावर निर्यातीसाठी येणारा ताण लक्षात घेता कोकणातील बंदरे विकसित झाली तर व्यावसायिकांसाठी ते दिलासादायक ठरेल. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यावसायिकांसाठी वेळेचीही बचत होईल. त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे या खात्याकडून पुढील काही काळात मोठ्या कामांची अपेक्षा केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Ajit Pawarअजित पवारfishermanमच्छीमारSea Routeसागरी महामार्गNitesh Raneनीतेश राणे