भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा पडला विहिरीत, वनविभागानं दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 13:53 IST2022-06-18T13:34:39+5:302022-06-18T13:53:01+5:30
बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा पडला विहिरीत, वनविभागानं दिलं जीवदान
वेंगुर्ला : भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा कठडा नसलेल्या विहिरीत पडला. काल, शुक्रवारी रात्री वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांच्या विहीरीत हा बिबट्याचा बछडा पडला होता. वनविभागानं या बछड्याला सुखरुप बाहेर काढत जीवदान दिलं.
आरोलकर यांच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बछड्याला बाहेर काढण्यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या बिबट्याच्या बछड्याला सुखरूपपणे बाहेर काढले आहे. अन् नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.