शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ठेकेदाराने ६५ लाखांचा भविष्य निर्वाह निधीच भरला नाही, सावंतवाडीत भर पावसात सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:08 IST

तब्बल ६५ लाखाचा गैरव्यवहार 

सावंतवाडी : ऐन गणेशोत्सवात सफाई कामगाराचा पगार थकवणाऱ्या नगरपरिषद ठेकेदाराने मागील काही वर्षापासून कामगारांची ६५ लाख रूपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कमच परस्पर हडप केली असून कर्मचाऱ्यांचा निधीच त्याच्या खात्यात भरला गेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पैसे कुठून देणार असा सवाल करत तब्बल साठ सफाई कामगारांनी भर पावसात सावंतवाडी नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन केले. रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. या सफाई कामगारा सोबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह विलास जाधव, सुरेश भोगटे यांनी ही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.शहरातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने बुडवलेली ६५ लाखांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर सोमवारी उपोषण सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत नगरपरिषद एकही अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी फिरकला नसल्याचे दिसून आले.पालिका अधिकारी या प्रकरणात लक्ष घालत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या उपोषणात केवळ कंत्राटी कर्मचारीच नाही, तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी  नगरसेवकांनीही सहभाग घेत निषेध व्यक्त केला.यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'पालिकेनेच ठेकेदारासोबत करारनामा केलेला असताना, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांशी आमचा संबंध नाही, असे अधिकारी कोणत्या आधारावर सांगतात ? उपोषणाला बसणार म्हणून कारवाईची धमकी देता. समोर या, मग बघतो!'' असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता असून जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.आंदोलनाला रवी जाधव, अफरोज राजगुरू, पुंडलिक दळवी, उमेश खटावकर, राजू बेग, सुंदर गावडे, अनारीजिन लोबो, सुरेंद्र बांदेकर, निशिकांत तोरस्कर, अशोक पेडणेकर, बावती फर्नांडिस, मनोज घाटकर, सचिन माडये, कॉम्रेड धोंडीबा कुंभार, कामगार श्रमिक संघ, कामगार संघटना प्रमुख बाबू बरागडे, नितीन कोकरे, विनोद काष्टे, रवी कदम भारती लाखे, अंजली वेंगुर्लेकर, संगीता कदम, गौतमी तेंडुलकर, आशा बारागडे आदिंनी पाठींबा दिला.