Sindhudurg: जानवली येथे कंटेनर उलटला, सुदैवाने चालक बचावला
By सुधीर राणे | Updated: May 12, 2023 13:15 IST2023-05-12T13:13:18+5:302023-05-12T13:15:39+5:30
महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचे चुकीचे काम ठरतेय अपघाताला कारणीभूत

Sindhudurg: जानवली येथे कंटेनर उलटला, सुदैवाने चालक बचावला
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरून सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर रस्ता दुभाजकावर जावून उलटला. या अपघातात कंटेनर चालकाला सुदैवाने किरकोळ दुखापत झाली. मात्र, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास महामार्गावरील जानवली रतांब्याचा व्हाळ येथे घडला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महामार्गावर केलेल्या लहान तसेच कमी उंचीच्या रस्ता दुभाजकामुळे आतापर्यंत अनेकदा अपघात झाले असून, याकडे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांचे दुर्लक्ष होत आहे.