Sindhudurg: धामापूर येथील जंगलात आढळला युवकाचा मृतदेह

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 23, 2023 06:58 PM2023-09-23T18:58:04+5:302023-09-23T18:58:29+5:30

युवक वेताळबांबर्डे येथून होता बेपत्ता

The body of the youth was found in the forest of Dhamapur Sindhudurg | Sindhudurg: धामापूर येथील जंगलात आढळला युवकाचा मृतदेह

Sindhudurg: धामापूर येथील जंगलात आढळला युवकाचा मृतदेह

googlenewsNext

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून बेपत्ता असलेल्या सचिन मधुकर घाटकर (वय-३०) या युवकाचा मृतदेह शनिवारी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिर लगतच्या जंगलमय भागात झाडास गळफास लावलेल्या स्थितीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, वनविभागाचे कर्मचारी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिरालगतच्या जंगलमय भागात फिरती गस्त घालत असता त्यांना एका झाडास गळफास लावलेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती मालवण पोलिस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.ए. सुतार, कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे पी.बी. मोरे, सुहास पांचाळ, सिद्धेश चिपकर यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात हा मृतदेह कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील सचिन मधुकर घाटकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. हा युवक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे पी.बी. मोरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The body of the youth was found in the forest of Dhamapur Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.