शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: घरासमोरील व्हरांड्यात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:31 IST

गुन्हेगारी पार्श्वभूमी

कुडाळ : तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदीप ऊर्फ बाळा दामोदर करलकर (५२), या युवकाचा राहत्या घरातच खून करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.  गावात पोलिसांकडून खुन्ह्याचा तपास सुरू असून खुनाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कुडाळ तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी ही अतिदुर्गम भागात वसलेली वाडी आहे. दहा ते बारा घरं असलेली ही छोटीशी वाडी असून या वाडीत संदीप करलकर आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. अलीकडे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या आईला अपंगत्वाचा झटका आल्यामुळे वडिलांचे दिवस-कार्य आटोपल्यानंतर मृत संदीप करलकर यांच्या छोट्या भावाने आपल्या आईला उपचारासाठी मुंबईला नेले होते.  त्यामुळे मृत संदीप करलकर एकटाच घरी राहत होता. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्याचा कुटुंबातील सदस्यांना सुद्धा त्रास होत होता. त्यामुळे तपासानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. मृत करलकर याच्या पश्चात आई,भाऊ, पुतण्या असा परिवार आहे.पोलिसांना फोनदरम्यान, शुक्रवारी संदीप करलकरचा खून झाल्याचा फोन निवती व कुडाळ पोलिसांना गेला. त्या माहितीच्या आधारे निवती व कुडाळ पोलिसांनी  येथे धाव घेतली. तत्पूर्वी संदीप करलकर यांचा मुंबई येथे राहत असलेला भाऊ संतोष करलकर आईचे आधारकार्ड घेऊन जाण्यासाठी पुतण्यासमवेत घरी आला. त्याला हा प्रकार निदर्शनास आला.पोलिसांकडूनही दुजोरापोलिसांची टीमही मृत संदीप करलकर यांच्या घरी दाखल झाली. घरातील समोरच्या व्हरांड्यात रक्तबंबाळ अवस्थेत संदीप करलकरचा मृतदेह पडला होता. घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू करुन हा खून असल्याचे सांगितले.

खुन्यांचा अद्याप तपास लागला नाही. आम्ही योग्य तपास करून  लवकरच त्या खुन्यापर्यंत पोहोचू. संदीप करलकर याचे  कोणाशी संबंध आले होते. त्याचा नेमका खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला. याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. -  विनोद कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, सावंतवाडी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस