सावंतवाडीतील मोती तलावात आढळला तरूणाचा मृतदेह 

By अनंत खं.जाधव | Updated: December 2, 2023 15:33 IST2023-12-02T15:33:35+5:302023-12-02T15:33:57+5:30

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात कोलगाव येथील अभिषेक अंकुश मेस्त्री (वय-40) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मूळ मालवण ...

The body of a young man was found in Moti Lake in Sawantwadi | सावंतवाडीतील मोती तलावात आढळला तरूणाचा मृतदेह 

सावंतवाडीतील मोती तलावात आढळला तरूणाचा मृतदेह 

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात कोलगाव येथील अभिषेक अंकुश मेस्त्री (वय-40) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मूळ मालवण - वराड येथील असून गेली काही वर्षे तो कोलगाव येथे राहत होता. 

गवंडीकाम कामगार असलेला हा तरुण मोती तलावाच्या काठावर बसलेला असताना तलावात कोसळला असावा, असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दुपारपासून तो बेपत्ता होता. दुपारी आपण बाजारात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. पण रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. 
तो कोलगावची जत्रा असल्याने जत्रेला गेला असावा असे घरच्यांना वाटले. परंतु रात्री उशिरा देखील तो घरी परतलाच नाही.म्हणून त्यांची शोधाशोध ही करण्यात आली मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान शनिवारी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी मोती तलावात साफसफाईसाठी उतरले असता त्यांना हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. 

त्यांनी त्वरित पोलिसांना कळविल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.त्यानंतर उत्तरणीय तपासणी साठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस  करीत आहेत. मेस्त्री याच्या मागे  पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The body of a young man was found in Moti Lake in Sawantwadi