चैतालीच्या पायाला दिलेला चटका ठरला टर्निंग पॉईंट, जखम ठरली पोलिसांसाठी दुवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 21:08 IST2023-12-12T21:07:44+5:302023-12-12T21:08:27+5:30
चैताली मेस्त्री ही दिड महिन्यापूर्वीच आपला चुलत दिर संदेश सोबत सावंतवाडीत आली होती.

चैतालीच्या पायाला दिलेला चटका ठरला टर्निंग पॉईंट, जखम ठरली पोलिसांसाठी दुवा
सावंतवाडी : सावंतवाडीत दोन दिवसांपूर्वी चैताली मेस्त्री या विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव रचून चुलत दिराकडूनच खुन करण्यात आला खरा पण चैताली मृत पावली काय हे बघण्यासाठी त्याने चक्क पायाला गरम चटका दिला आणि हाच चटका पोलिसांच्या तपासाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि आरोपी संदेश मेस्त्री पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
चैताली मेस्त्री ही दिड महिन्यापूर्वीच आपला चुलत दिर संदेश सोबत सावंतवाडीत आली होती.सावंतवाडीत आल्या नंतर या दोघांनी छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली आणि येथेच भाड्याने घर घेऊन राहायला सुरुवात केली होती.
स्थानिकांच्या मते संदेश ला मद्यपान करण्याची सवय होती शनिवारी सकाळी संदेश ने घरी मटण व मासे आणून दिले व चैतालीला जेवण करायला सांगितले आणि तो कामाला निघून गेला होता तो कामावरून जेव्हा दुपारी दिड च्या सुमारास पुन्हा घरी आला तेव्हा चैताली जेवण करून झोपी गेली होती हे बघून संदेश चा संताप वाढला होता.जेवण वाढ म्हणून सांगितले तरी चैताली उठली नसल्याने संदेश चा संताप आणखीच वाढला आणि मग त्याने टोकाचे पाऊल उचलत थेट चैतालीला मारहाण केली या मारहाणीत चैताली ही बेशुद्ध झाली होती हालचाल थांबली होती त्यामुळे आपण आता पुरतो अडकलो असे म्हणत संदेश ने पुढचे पाऊल उचलत चैतालीला गळफास लावून वर टागून ठेवले पण संदेश ला खात्री पटत नव्हती.कि चैताली मृत पावली यांची तो काहि वेळ तसाच बसून होता.
नंतर त्याने चैताली मृत पावली का?हे बघण्यासाठी त्याने चिमटा गरम करून चैताली च्या पायाला लावला त्यामुळे तिच्या पायाला जखम झाली आणि येथेच संदेश फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला जेव्हा पोलिस घटनास्थळी आले तेव्हा घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच मृतदेह बघितला तेव्हा तिच्या पायाला चटका दिलेली जखम ताजी असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी आणखी खात्री केली असता एकामागोमाग एक संशयाच्या सुई चुलत दिर संदेश कडे जाऊ लागल्याने संदेश अलगद पोलिसांच्या कचाट्यात सापडला. पोलिसांनी ही सुरूवातीचे काही तास संदेश नेच हे कृत्य केले हे जाणवू ही दिले नाही त्यामुळे आपला गुन्हा पचला असेच त्याला वाटू लागले होते. पण पोलिसांनी आपल्या खाक्या बाहेर काढताच संदेशने पूर्ण घटनाक्रम सागितला आणि पूर्ण तपास पोलिसांना सोपा करून दिला.