शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Sindhudurg: घनदाट जंगलात साखळदंडाने बांधलेल्या 'त्या' अमेरिकी महिलेला उपचारासाठी गोव्याला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:52 IST

अद्याप जबाब नोंदविण्यात आला नाही : तपास बांदा पोलिसांकडे

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात शनिवारी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या महिलेवर सध्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अधिक उपचारार्थ या महिलेला गोवा-बांबोळी येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती बांदा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बडवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या महिलेची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.शनिवारी मूळ अमेरिकन पण सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्याला असणारी ललिता कायी कुमार एस. ही महिला रोणापाल येथील घनदाट जंगलात एका झाडाला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत गुराख्याला आढळून आली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळदंडातून मुक्तता केली आणि येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.मात्र, महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत; पण अद्यापपर्यंत तिची प्रकृती सुधारत नसल्याने पोलिसांनी तिला गोवा-बांबोळी येथील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत तिला या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे.दरम्यान, ही महिला रोणापालपर्यंत आली कशी याबाबतची माहिती पोलिस गोळा करत आहेत. तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याने पोलिसांना यात माहिती गोळा करणे कठीण होत आहे. हा जबाब पुढील चार दिवसांत नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बडवे यांनी स्पष्ट केले आहे.

महिलेच्या तोंडात पतीचे नावपोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून काही प्रश्न या महिलेला विचारण्यात आले. त्यावेळी त्या महिलेने हे कृत्य पतीकडून केले असेच म्हणाली होती. त्यावरून पोलिस तिच्या कुटुंबाविषयी माहिती घेत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस