शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच महिलांबद्दल एकच भूमिका घ्या, नितेश राणे यांचा विरोधकांना टोला

By सुधीर राणे | Updated: July 22, 2023 15:40 IST

राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले. त्याबद्दल काँग्रसचे मुख्यमंत्री कारवाई करणार काय?

कणकवली: सर्वच महिलांबद्दल एकच भूमिका असली पाहिजे. विरोधकांना मणिपूरबद्दल ऐकायचे असेल तर, दिशा सालियन आणि डॉ. पाटकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे ते सुद्धा आम्हाला ऐकायचे आहे असा प्रतिप्रश्न आमदार नितेश राणेंनी केला.

काँग्रेसच्या महिला आमदारांनी विधिमंडळाबाहेर मणिपुरातील घटनेचा जसा निषेध केला आणि न्यायाची मागणी केली, त्याचप्रमाणे राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले गेले आहे. त्याही घटनेचा निषेध करावा. या प्रकरणात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली व सोनिया गांधी, राहुल, प्रियांका यांची भूमिका काय आहे? हे त्यांनी जाहीर करावे असेही ते म्हणाले. तसेच मोदी सरकार आणि भाजप विरोधात विनाकारण नकारात्मकता पसरविण्याचे काम विरोधकांनी बंद करावे असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.कणकवली येथे शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतःला महिलांचे कैवारी समजतात ते ठाकरे सेनेतील संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचा मुलगा महिला हक्कावर बोलतो,  तेव्हा या लोकांनी ज्या महिलांना त्रास दिला, त्या महिलांना ते पाहून त्रास होत असेल. काँग्रेसच्या महिला आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलत आहेत. पण दिशा सालियान,डॉ. पाटकर यांना न्याय देण्यासाठी विरोधी पक्षाच्या महिला आमदार पुढे येतील काय? राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले. त्याबद्दल तेथील काँग्रसचे मुख्यमंत्री कारवाई करणार काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला.पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर घटने संदर्भात खूप कडक भूमिका घेतली आहे. त्या व्हिडिओत जे राक्षस दिसत आहेत. त्यांची गय केली जाणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, विरोधक राजकारण करून मोदींना टार्गेट करण्यासाठी देशाची बदनामी करत असल्याचेही ते म्हणाले.करेक्ट कार्यक्रम काय असतो? ते संजय राऊत यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यसभेत चर्चा करायचे सोडून भांडुप मध्ये बसून बोलू नये असेही राणे म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Manipur Violenceमणिपूर हिंसाचारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस